ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांवर ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

कालच्या भागात आपण नवग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि ग्रहदोष म्हणजे काय ? याविषयी पाहिले. आज आपण पुढचा भाग पाहूया.

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429140.html

लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429527.html

श्री. राज कर्वे

६. ‘साधना करणे’ हाच सर्वोत्तम उपाय !

६ इ ३. संतांनी केलेल्या साहाय्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी अविरतपणे झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळणे

६ इ ३ अ. सर्व ज्योतिषाचार्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग वर्ष २००७ मध्ये (आणि त्यानंतरही) असल्याचे सांगणे : ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी अविरतपणे झटणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आजपर्यंत अनेक वेळा महामृत्यूयोगाचे संकट आलेले आहे. वर्ष २००१ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींकडून होणारी आक्रमणे वाढत गेली. वर्ष २००७ पासून त्यांच्यावरील प्राणांतिक आक्रमणांना आरंभ झाला. सर्व ज्योतिषाचार्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग वर्ष २००७ मध्ये (आणि त्यानंतरही) असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांची प्राणशक्ती ३० टक्क्यांच्या जवळपास येऊन स्थिरावली आहे. (प्राणशक्ती ३० टक्क्यांहून न्यून झाल्यास मृत्यू येतो. ‘सर्वसाधारण व्यक्तीची प्राणशक्ती १०० टक्के असते’, असे येथे गृहित धरले आहे.) वर्ष २००७ च्या आजारपणानंतर त्यांचे आश्रमाच्या बाहेर जाणे पूर्ण थांबले. वर्ष २००७ च्या गुरुपौर्णिमेनंतर अनुमाने १ आठवडा ते मरणोन्मुख अवस्थेत होते.

६ इ ३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वर्ष २००७ मध्ये असलेल्या महामृत्यूयोगाविषयी ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण : ३०.७.२००७ या दिवशीच्या गुरुपौर्णिमेनंतर पुढील एक सप्ताह परात्पर गुरु डॉ. आठवले मरणोन्मुख स्थितीत होते. ऑगस्ट २००७ मध्ये ते अंथरुणाला खिळून होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गोचर (तत्कालीक) कुंडलीत मंगळ ग्रह बाराव्या स्थानात, म्हणजे अशुभ स्थानात होता. आरोग्याशी संबंधित रवि या ग्रहाची शनि आणि केतू या पापग्रहांशी युती झाली होती. जन्म कुंडलीनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्या वेळी मृत्यू स्थानाचा स्वामी असलेल्या शनि ग्रहाची महादशा आणि मृत्यू स्थानात असलेल्या चंद्र ग्रहाची अंतर्दशा चालू होती. ही ग्रहस्थिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना महामृत्यूयोग असल्याचे दर्शवते.

६ इ ३ इ. संतकृपेने काहीही असाध्य नाही ! : संतांनी केलेल्या साहाय्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग अनेक वेळा टळला आहे. यासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धानुसारच होतात’, असे कर्मयोग सांगतो. असे असले, तरी ‘केवळ अपमृत्यूयोग आणि मृत्यूयोगच नाही, तर महामृत्यूयोगही टाळता येतो’, हे योगतज्ञ दादाजी वैशंपायन, गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी आणि इतर काही अधिकारी संत यांनी माझ्या संदर्भात वर्ष २००७ पासून आतापर्यंत सिद्ध करून दाखवले आहे. यावरून ‘संतकृपेने काहीही असाध्य नाही’, हे लक्षात येते.’’

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास विहंगम गतीने आध्यात्मिक उन्नती होणे

कर्म, भक्ती, ध्यान इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्यातून ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेविना गत्यंतर नाही; म्हणूनच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘केवळ गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.’ ‘गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे’, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे न घालवता गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ?’, हे गुरुकृपायोग शिकवतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होते. गुरुकृपायोगानुसार साधना ही सध्याच्या काळानुसार सांगितलेली साधना आहे.

७ अ. गुरुकृपायोगानुसार साधना करून आतापर्यंत १०८ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तसेच १ सहस्र १०६ साधक संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

(टीप : ‘निर्जीव वस्तू म्हणजे १ टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी’, असे गृहित धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार तिची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्‍चित करता येते. कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्‍यांना ‘संत’ म्हणतात.)

८. तात्पर्य

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. व्यक्तीला मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते. त्यामुळे ग्रहदोषांचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हाच सर्वोत्तम उपाय आहे !’

(समाप्त)

– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक