आमच्याही वर एखादे न्यायालय असते, तर ५० टक्के आदेश पालटले गेले असते ! – सर्वोच्च न्यायालय

‘जनतेच्या मनातील शंका दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निकाल देतांना असे जे म्हटले आहे, त्यावर न्यायव्यवस्थेने विचार करून ही त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत’, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !

(म्हणे) ‘कर्नाटकातील इंचभरही भूमी देणार नाही !’

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेली ६० वर्षे चालू असून तो सामोपचाराने सोडवण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारचे विधान करणे संतापजनक आहे, हे येडियुरप्पा यांनी लक्षात घ्यायला हवे !

दिग्दर्शक साजिद खान यांनी अभिनेत्री जिया खान हिचे लैंगिक शोषण केले होते !

चित्रपटातील महिला कलाकारांचे लैंगिक शोषण करणार्‍या साजिद खान यांच्यासारख्या वासनांधांवर प्रेक्षकांनीच बहिष्कार टाकून त्यांना अद्दल घडवली पाहिजे !

राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नसल्याने तिरंगी मास्क वापरण्यावर बंदी घाला !

नंदुरबार, सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासनास निवेदन

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजचे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठांची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

वेबसिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी, अशी तक्रार हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिली.

येरला (जिल्हा नागपूर) गावातील २ तरुणांना मारहाण केल्याने संतप्त महिलांनी अवैध मद्यविक्रेत्यांची ६ वाहने जाळली !

खरेतर पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे होते. येथे पोलिसांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला !

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा शिवसेनेकडून निषेध

कर्नाटकातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून शिवसेनेने येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे मिरजकर तिकटी येथे दहन केले.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती सुस्थितीत असल्याचे पुरातत्व विभागातील तज्ञांचे मत !

श्री महाकाली आणि श्री महासरस्वती देवींच्या मूर्तींची झीज झाल्याने संरक्षणाकरिता दोन्ही मूर्तींची रासायनिक जतन प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात ११ जणांवर कोरोनाच्या लसीचे किरकोळ दुष्परिणाम

‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.