आत्महत्या केलेली अभिनेत्री जिया खान हिची बहीण करिश्मा खान हिचा आरोप
|

मुंबई – वर्ष २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफूल’ या चित्रपटाचा सराव चालू असतांना जिया खान हिला साजिद खान याने कपडे काढायला सांगितले होते. या चित्रपटासाठी त्यांच्यासमवेत करार केला असल्यामुळे तिला त्या चित्रपटात काम करावे लागले, असे जिया खान हिची बहीण करिश्मा खान हिने ‘डेथ इन बॉलिवूड’ या माहितीपटाच्या दुसर्या भागात सांगितले आहे. ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवर हा माहितीपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटात काम केले नाही, तर कारवाई करतील. करिअर संपेल, यामुळे चित्रपटात काम करणे आणि लैंगिक शोषणाला सामोरे जाणे अपरिहार्य असल्याने जिया हिची कोंडी झाली होती. असे करिश्मा खान यांनी सांगितले.
BBC ‘Death in Bollywood’ documentary: Jiah Khan’s sister narrates how Sajid Khan harassed the actor, says ‘he asked her to take off her top’https://t.co/pU3YBHhmHt
— OpIndia.com (@OpIndia_com) January 18, 2021
यापूर्वी मॉडेल पौला हिने दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पौला हिने सामाजिक माध्यमांवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘साजिद मला अश्लील संदेश पाठवत असे. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितले. त्याने असे किती महिलांसमवेत केले आहे, हे देवच जाणो. तेव्हा मी बोलू शकले नव्हते; पण आता पुरे झाले. त्याला कारागृहात डांबले पाहिजे.’
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉसिटीव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण