राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नसल्याने तिरंगी मास्क वापरण्यावर बंदी घाला !

नंदुरबार येथील राष्ट्राभिमान्यांची निवेदनाद्वारे मागणी

नंदुरबार – तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे, हा ध्वजाचा अवमानच आहे, तसेच राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७२०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे प्राध्यापक डॉ. सतीश बागुल, राहुल मराठे, उद्योजक शंकर बालानी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नरेंद्र तांबोळी, धर्मप्रेमी गौरव धामणे, योगेश जोशी यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकाारी सुधीर खांदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे विजयसिंग राजपूत, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी निवेदन स्वीकारले.

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथेही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासनास निवेदन

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी नागरिक

सांगोला (जिल्हा सोलापूर), १९ जानेवारी (वार्ता.) – येथेही दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि नगरपालिका येथे १९ जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले.

या वेळी सांगोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘प्लास्टिकचे ध्वज विक्री होणार नाहीत, याची काळजी घेऊ, तसेच आम्ही नगरपालिकेलाही कळवू’, असे सांगितले. नगरपालिका येथे मुख्याधिकार्‍यांच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी नवनाथ कावळे, हरि पिसे, संतोष शेंबडे, युवराज मोटे, भीमाराम चौधरी, भारत पैलवान, विनोद गायकवाड, प्रवीण लांडगे, विनय कांबळे, दुर्गेश कावळे, हिंदु जनजागृती समितीचे संतोष पाटणे आदी राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.