हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजचे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठांची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

पोलीस निरीक्षक अनिल गुजर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १९ जानेवारी (वार्ता.) – ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेबसिरीजमध्येे शिव आणि श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. यात महादेव आणि नारदमुनी यांची अशोभनीय वेशभूषा केलेले कलाकार आहेत. त्यांच्या तोंडी संदर्भहीन आणि अश्‍लील वक्तव्ये आहेत. या वेबसिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून वेबसिरीज साकारणारे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार १८ जानेवारीला हिंदुत्वनिष्ठांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, ब्राह्मण महासंघाचे श्री. नितीश कुलकर्णी आणि श्री. अमित दीक्षित, तसेच अंबाबाई भक्त समितीचे श्री. महेश उरसाल उपस्थित होते.