मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

पुण्यातील ज्‍योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !

कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !

Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी

नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !

पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्‍या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ एप्रिलला पंतप्रधानांची कोल्हापुरात जाहीर सभा ! – राजेश क्षीरसागर

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे २७ एप्रिलला कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातून १९ जण हद्दपार !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज प्रांताधिकार्‍यांनी सांगली येथील १९ जणांना महापालिका क्षेत्रातून १० दिवसांसाठी हद्दपार केले आहे.

विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग, महापालिका क्षेत्र अध्यक्ष, भाजप

ते पुढे म्हणाले की, भाजपचे ८ आणि महायुतीचे ३, असे ११ माजी नगरसेवक एकत्रच आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रसारासाठी ते कार्य करत आहेत.

लोहगाव (पुणे) विमानतळ देशामध्ये ९ व्या स्थानावर, तर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये ८ व्या स्थानावर !

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्‍या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.

पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. प्रकल्पावर महापालिकेची कारवाई !

उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?