युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे  येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! 

हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ! – बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शी जिनपिंग यांना लोकशाही ठाऊक नाही ! – जो बायडेन यांनी फटकारले

एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले.

चीनकडून शेजार्‍यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत ! – अमेरिका

अमेरिकेने केवळ अशी वक्तव्ये करून गप्प न बसता स्वतः चीनवर कारवाई करणे अपेक्षित आहे !  

(म्हणे) ‘शीत युद्ध झाल्यास संपूर्ण जगाची हानी होईल !’ – शी जिनपिंग यांची चेतावणी

युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्‍या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी आणि मग जगाला उपदेश करावा !

‘अलीबाबा’ लुटणारे ‘चिनी’ चोर !

‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’च्या कथेचा आस्वाद आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी घेतला असेल. आता ‘अलीबाबा आणि ‘चिनी’ चोरा’च्या कथेला आरंभ झाला आहे. या कथेचाही राष्ट्रप्रेमी भारतियांनी आस्वाद घ्यावा; कारण वेळ, शक्ती, पैसा न वापरता शत्रूचे स्वतःच्या कर्माने अधःपतन होत असेल, तर ते कुणाला नको आहे ?