PM Modi Awarded In Dominica & Guyana : डॉमिनिका आणि गयाना या देशांचा पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च सन्मान !

डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार प्रदान करताना

जॉर्जटाउन (गयाना) –  कॅरेबियन देश डॉमिनिकाने पंतप्रधान मोदी यांना ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. कोरोना महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये लस वितरित केल्यावषयी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गयाना या देशानेही पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित केले आहे. याखेरीज बार्बाडोस या देशाने पंतप्रधान मोदी यांना ‘ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.

गयानाच्या दोन दिवसीय दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांनी कॅरेबियन देशांच्या प्रतिनिधींसमवेत दुसर्‍या ‘भारत-कॅरिकॉम’ शिखर परिषदेत भाग घेतला. पंतप्रधानांनी कॅरेबियन देशांच्या प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा केली. ५६ वर्षांनंतर प्रथम भारतीय पंतप्रधानांनी गयानाचा दौरा केला आहे. दोन्ही देशांच्या कृषी संस्थांमधील सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारत गयानामध्ये जन औषधी केंद्र उघडणार आहे.