Rs 40 cr Cow : भारतीय वंशाच्या गायीला ब्राझिलमध्ये मिळाली ४० कोटी रुपयांची किंमत !

रिओ दी जानरो (ब्राझिल) – ब्राझिलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात भारतीय गायीला तब्बल ४० कोटी रुपयांची किंमत मिळाली. नेल्लोर प्रकारातील ‘वियाटिना-१९’ नावाची ही गाय आहे. या गायीचे वजन १ सहस्र १०१ किलो आहे, जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे. ‘चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत या गायीला ‘मिस साऊथ अमेरिका’ हा पुरस्कार मिळाला होता. जगातील विविध पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी तिचे भ्रूण जगभर निर्यात केले जातात.

१. नेल्लोर गायीचा प्रकार भारतात ‘ओंगोल’ म्हणूनही ओळखला जातो. आंध्रप्रदेशातील ओंगोल प्रदेशातील या गायी अतीउष्णतेचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. या गायींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम असते, त्यामुळे त्यांना आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये पुष्कळ खास बनवले जाते.

२. नेल्लोर गायीचा प्रकार पहिल्यांदा १८ व्या शतकात ब्राझिलमध्ये नेण्यात आला. प्रभावी स्नायू आणि उच्च प्रजननक्षमता यांमुळे या गायीला ब्राझिलमध्ये पशूधन उत्पादकता वाढण्यात या गायीच्या प्रकाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.