युट्रेक्ट (नेदरलॅण्ड) शहरात ट्राममध्ये गोळीबारात १ जण ठार, अनेक घायाळ

१८ मार्च या दिवशी शहरातील ट्राममध्ये (गाड्यांचा १ प्रकार) अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात १ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलंडमध्ये गेल्या ३ दशकांत ४०० हून अधिक पाद्रयांकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण

येथे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पोलंडमधील एका मोठ्या कॅथलिक चर्चने, ‘गेल्या ३ दशकांत चर्चच्या ४०० हून अधिक पाद्रयांनी लहान मुलांचे आणि मुलींचे लैंगिक शोषण केले’, हे स्वीकारले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्या जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदु संतांवरील खोट्या आरोपांना कुप्रसिद्धी देतात !

फ्रान्स मसूद अझहरची त्याच्या देशातील संपत्ती जप्त करणार

फ्रान्सने जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याची फ्रान्समधील संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी सैन्य काश्मिरी लोकांना आत्मघातकी आक्रमणासाठी दबाव टाकते !

पाक सरकारने या आतंकवादी ठिकाणांना नष्ट करण्याचे दायित्व घेतले पाहिजे आणि या आतंकवाद्यांपासून सुटका करून घेतली पाहिजे. हे आतंकवादी केवळ स्थानिक लोकांचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय शांतता नष्ट करत आहेत. – पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्ते एम्. हसन

लंडनमध्ये पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’चे खलिस्तानी समर्थकांच्या साहाय्याने भारतियांवर आक्रमण

पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’ने लंडनमधील काश्मिरी खलिस्तानी समर्थकांना हाताशी धरून भारतीय नागरिकांवर आक्रमण केल्याची घटना ९ मार्चच्या रात्री येथील भारतीय दूतावासाबाहेर घडली.

लंडनमधील हिथ्रो विमानतळासह ३ ठिकाणी स्फोटकांचे टपाल सापडले !

येथील हिथ्रो विमानतळ, वॉटर्लू मेट्रो स्थानक आणि लंडन सिटी विमानतळ या ठिकाणी स्फोटकांचे पार्सल सापडल्याने स्कॉटलंड यार्ड आतंकवादविरोधी विभागाने संपूर्ण देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. हिथ्रो विमानतळाच्या टपाल विभागात ५ मार्चला सकाळी एक पुडके आले. ते उघडताच त्याने पेट घेतला.

वायूप्रदूषणामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू ! – संयुक्त राष्ट्र

घर आणि घराबाहेरील वायूप्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू होत असतो. यात ६ लाख मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पर्यावरण आणि मानवाधिकार यांविषयीचे संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत डेविड आर्. बॉयड यांनी दिली आहे.

व्हॅटिकन सिटीचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले !

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

पाद्य्रांकडून झालेले लहान मुलांचे लैंगिक शोषण नरबळीसारखे ! – पोप फ्रान्सिस

चर्चमध्ये पाद्य्रांकडून मुले, नन्स आणि महिला यांच्या लैंगिक शोषणाच्या जगभरात असंख्य घटना घडल्या आहेत अन् घडत आहेत; मात्र भारतातील ख्रिस्तीप्रेमी आणि ख्रिस्ती मालक असलेली तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमे यावर मौन बाळगतात !

लैंगिक शोषण झालेली मुले न्यायाची मागणी करत आहेत ! – पोप फ्रान्सिस 

गेली अनेक वर्षे पाद्य्रांकडून लहान मुले, महिला आणि नन यांचे लैंगिक शोषण केले जात आहे; मात्र ते रोखण्यासाठी व्हॅटिकन सिटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत आणि आताही ते करत नसल्याने पोप यांना असे विधान करावे लागत आहे, हे स्पष्ट होते !


Multi Language |Offline reading | PDF