|
(‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेद्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांसाठी अनुकूल बनवली जातात.)

लंडन (ब्रिटन) – व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या वादावादीच्या घटनेचा लाभ अमेरिका किंवा युक्रेन यांना नव्हे, तर केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना झाला. त्यामुळे जर मला खनिज करारासाठी बोलावले गेले, तर मी व्हाईट हाऊसमध्ये परत जाईन, अशी कोलांटउडी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मारली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जेव्हा पदावर बसले, तेव्हापासून ते झेलेंस्की यांना युद्ध थांबवण्याचे आणि युक्रेनमधील खनिजांच्या संदर्भात अमेरिकेशी करार करण्याचे आवाहन करत आहेत. ट्रम्प यांच्यासमवेत खनिज करारावर स्वाक्षरी करण्यासाठी झेलेंस्की २८ फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेत आले होते; परंतु त्यांचा ट्रम्प यांच्याशी वाद झाला. यानंतर झेलेंस्की कोणताही करार न करता लंडनला निघून गेले. आता त्यांना युक्रेनचे हित कशात आहे ?, याची जाणीव झाल्याने त्यांनी वरील विधान केल्याचे सांगितले जात आहे. झेलेंस्की यांच्या या विधानावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
🚨 "My Dispute with Trump Benefited Only Russia!" – Zelensky 🚨
🇺🇦 Ukraine's President Zelensky claims he is ready to sign a mineral deal with the US.
But instead of saying who benefited, why doesn’t Zelensky reveal who suffered the most?
💥 Why is Zelensky betraying the… pic.twitter.com/DciAD2PpS3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 4, 2025
१. झेलेंस्की पुढे म्हणाले की, मला आशा आहे की, युक्रेनच्या सुरक्षा हमींच्या मागण्या ऐकल्या जातील. जर दोन्ही पक्ष यावर सहमत झाले, तर करारावर स्वाक्षरी होईल. अमेरिकेने युक्रेनची बाजू ऐकून घ्यायला हवी. आपल्या भागीदारांनी ‘या युद्धात आक्रमक कोण आहे ?’, हे लक्षात घेतले पाहिजे.
२. झेलेंस्की यांनी सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, आम्हाला अमेरिकेचे महत्त्व समजते. असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मी अमेरिकेचे आभार मानले नाहीत. शांततेसाठी सुरक्षा हमी आवश्यक आहे, याच्याशी आपण सर्व जण सहमत आहोत. संपूर्ण युरोपमध्ये हीच परिस्थिती आहे.
संपादकीय भूमिका
|