Islamic State Terrorist Sentenced In Germany : ‘इस्लामिक स्टेट’च्या दोन आतंकवाद्यांना जर्मन न्यायालयाने सुनावली शिक्षा !

कुराण जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संसदेवर केले होते आक्रमण !

बर्लिन – स्वीडिश संसदेवर आक्रमण केल्याच्या आणि पोलिसांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी जर्मन न्यायालयाने इस्लामिक स्टेटच्या दोन आतंकवाद्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. इब्राहिम (वय ३० वर्षे) आणि रामीन (वय २४ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत.  दोघेही पूर्व जर्मन राज्यातील थुरिंगिया येथील गेरा येथील रहिवासी आहेत. कुराण जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी हे कृत्य केले होते. न्यायालयाने इब्राहिमला ५ वर्षे ६ महिने, तर रामीनला ४ वर्षे २ महिने शिक्षा सुनावली.

पोलिसांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये दोघांनाही अटक केली होती. जर्मन अधिकार्‍यांनी सांगितले की, हे दोघेही ‘इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत’शी जोडलेले होते. त्यांना युरोपमध्ये आक्रमण करण्याचा आदेश मिळाला होता.