हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान !

अधिवक्त्या ( सौ.) भारती जैन (डावीकडे) यांना मानपत्र देतांना प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २६ जानेवारी (वार्ता.) – मराठी भाषा विश्व, पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन विविध ठिकाणी आयोजित केले जाते. २६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी भगूर (जिल्हा नाशिक) येथे हा पुरस्कार अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना घोषित झाला होता. काही अपरिहार्य कारणास्तव अधिवक्त्या (सौ.) भारती जैन तेथे उपस्थित राहू शकल्या नाहीत. डॉ. ए.बी. पाटील यांनी विशेष वेळ काढून सौ. जैन यांना हा पुरस्कार आणि मानपत्र प्रदान केले.

प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांचे आतापर्यंत २४ हून अधिक चरित्रात्मक ग्रंथ प्रकाशित झाले असून ते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, मुंबईचे सदस्य आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी आहेत. त्यांनी अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांचे हिंदुत्व आणि सामाजिक कार्य यांचे कौतुक करून मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.