‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्ताराचा निर्णय तातडीने घ्यावा ! – आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना
कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा करण्यासाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे सहस्रावधींच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे.