कार्तिक वारी सोहळा कार्तिक कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यंत चालणार !
बुधवारी द्वादशीला शासकीय पंचोपचार पूजा होऊन दुपारी रथोत्सव साजरा होईल. गुरुवारीही पवमान महापूजा होऊन सकाळी आणि सायंकाळी कीर्तन सेवा होईल आणि त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
आळंदीत इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्याची भोसरी येथील ज्ञानाई भजनी मंडळाच्या महिलांची मागणी !
‘नदीची स्वच्छता करा’, इतकी प्राथमिक गोष्टही सांगावी लागणार्या प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचाच कशाला ? अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे !
आज आळंदी येथे हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी अधिवेशन !
राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने होणारे हे अधिवेशन दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे घेण्यात येणार आहे
एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत सहस्रो वारकर्यांची मांदियाळी !
ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असून सध्या दर्शनासाठी ४ घंट्यांपेक्षा अधिक काळ लागत आहे. दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पुलाकडे गेली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे
वरळी येथील अपघातप्रकरणी मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने दोघांच्या अटकेला आव्हान देणार्या याचिका फेटाळून लावल्या.
निवडणूक निकालानंतर अनधिकृत होर्डिंगमुळे नवी मुंबई शहराचे विद्रूपीकरण !
नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांची विज्ञापने शहरात मोठ्या प्रमाणात विनाअनुमती लावण्यात आली आहेत. यामुळे शहरात विद्रूपीकरण झाले आहे.
भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विरोध करूनही कोथरूड (पुणे) येथे दिलजीत दोसांझ यांचा कार्यक्रम झाला !
कोथरूड येथील ‘काकडे फार्म’ परिसरामध्ये २४ नोव्हेंबर या दिवशी दिलजीत दोसांझ याचा ‘म्युझिक कॉन्सर्ट’ कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रहित करावा; म्हणून स्थानिकांनी आंदोलन केले होते, तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला सूचना केली होती.
पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !
विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘सनातन संस्था’ आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !
आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिर आयोजित करण्यात आले होते.