मिठबांव येथे ३०० वर्षांनी साजरा झाला देवहोळीचा उत्सव

तालुक्यातील मिठबांव, कातवण, तांबळडेग या तिन्ही गावांचे ग्रामदैवत असलेल्या  मिठबाव येथील श्री देव रामेश्वराचा देवहोळी उत्सव ३०० वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

भारतीय नौदलाची आय.एन्.एस्. ‘गुलदार’ नौका विजयदुर्ग बंदरात दाखल 

भारत सरकारने भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली आय.एन्.एस्. ‘गुलदार’ ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) सुपुर्द केली आहे.

भाजप-मगो युती मोदी यांचे विचार घरोघरी पोचवण्याचे काम करील ! – विश्वजीत राणे

भाजप आणि मगो या २ पक्षांची युती कायम राहील आणि ही युती मोदी यांचे विचार घरोघरी पोचवण्याचे काम एकत्रितपणे करील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना फाशी देण्याची जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिकांची मागणी !

आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवावा, पसार आरोपीला अटक करावी, आरोपींना कारागृहात देण्यात येणारी विशेष वागणूक बंद करावी, गुन्हेगारांना ते वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यात न ठेवता दुसर्‍या जिल्हा कारागृहात ठेवावे अशा मागण्या या वेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

संगमनेर येथे विनयभंगाच्या प्रकरणी धर्मांधाला अटक !

अशा आरोपींना शरीयतनुसार भर चौकामध्ये चाबकाचे १०० फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

किन्हई (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू !

मावळमधील किन्हई गावाजवळ इंद्रायणी नदीत ५ मित्र पोहायला गेले होते. त्यांपैकी तिघांचा पोहतांना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल येथे रहाणारे आहेत.

सिंहगड रस्त्यावरील ‘नंबरप्लेट’ बसवणारी २ केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास !

नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?

‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ एप्रिलपासून गोव्यातील ५ सहस्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार

गोव्यात पहिल्यांदाच ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ ही संस्था सरकारी आणि सरकार अनुदानित शाळांमधील सुमारे ५ सहस्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार आहे.

देहली-गोवा गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस !

मडगाव रेल्वेस्थानकावर काही दिवसांपूर्वी ‘चिकन’ असे लिहिलेल्या गोणीत (पार्सलमध्ये) कुजलेले गोमांस आढळल्याने देहली ते गोवा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस आले आहे.

मंगळुरूजवळ बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघड : १०० किलो गोमांस जप्त !

मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्‍या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यात असे घडणे, यात काय आश्चर्य ?