५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी ‘५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार आहेत’, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम रहातील.

आमदार केसरकर यांच्या आश्‍वासनानंतर रवि जाधव यांचे उपोषण मागे

नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.

देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.

कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

पिंगुळी-गुढीपूर येथील परशुराम गंगावणे ! ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.

लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित !

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना त्यांच्या विशेष कामगिरीविषयी राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ४० जणांना हे पदक घोषित झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सावंत हे एकमेव आहेत.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

सिक्कीम सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी चोपले !

चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !