इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू असलेले काम

मिरज, २६ जानेवारी – मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह नेहमी स्वच्छ रहावे, अशी इच्छा असणारे मिरजेतील जागरूक नागरिक, नाट्यकर्मी आणि इंद्रधनू कलाविष्कार संस्था यांनी नाट्यगृह परिसरातील कचर्‍याच्या गाड्या हटवाव्यात, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनास आदेश दिल्यानंतर महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.