व्यापारीवर्गाला ब्लॅकमेल करणे सहन करणार नाही ! – शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांची चेतावणी
सावंतवाडी – नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते. २५ जानेवारीला माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतल्यावर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन योग्य न्याय देण्यात येईल, असे आश्वासन आमदार केसरकर यांनी दिल्याने जाधव यांनी उपोषण मागे घेतले.
सावंतवाडी शहराला सुंदर शहर बनवण्यासाठी नागरिक, व्यापारी यांना विश्वासात घेऊन आतापर्यंत काम केले. त्या वेळी कुणावरही अन्याय केला नाही; मात्र आता शहरात जे चालले आहे ते चुकीचे आहे. व्यापार्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात, असे मला समजले आहे. असे प्रकार येथे चालणार नाहीत, अशी चेतावणी माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
या वेळी आमदार केसरकर म्हणाले, पूर्वीही शहरात स्टॉल होते. शहर विद्रुप वाटत होते; परंतु सर्वांना विश्वासात घेऊन स्टॉल काढले. त्यांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे शहर सुंदर बनले.