स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित !

पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत

कोल्हापूर – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना त्यांच्या विशेष कामगिरीविषयी राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ४० जणांना हे पदक घोषित झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सावंत हे एकमेव आहेत. सावंत यांनी यापूर्वी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढणे, चोर्‍या उघडकीस आणणे याचसमवेत अन्य गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या या कामाची नोंद घेऊन राज्य शासनाने त्यांना पोलीस पदक घोषित केले आहे.