भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

पाण्याची पाईपलाईन फुटून पिंपरीमध्ये (पुणे) सहस्रो लिटर पाणी वाया !

नेहरूनगर, पिंपरी येथे महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे सहस्रो लिटर पाणी वाया गेले, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना २९ नोव्हेंबर या दिवशी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. मागील ३ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा चालू आहे.

शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दादर आणि गोवंडी येथील शाखांनी साप्ताहिक सुटी शुक्रवार करण्याचा निर्णय घेतला मागे !

वास्तविक असा निर्णय घेतलाच कसा ? हे अधिकोष पाकिस्तानात आहे का ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तक्रार नोंदवली नसती, तर हे असेच चालू राहिले असते. शुक्रवारची सुटी घोषित करणार्‍यांवर प्रथम कारवाई करा !

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

‘द काश्मीर फाइल्स’ मधील एक जरी दृश्य असत्य असेल, तर चित्रपटनिर्मिती सोडून देईन ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात मनोगत व्यक्त करतांना ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका केली. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी वरील उत्तर दिले.

पनवेल येथे लव्ह जिहादच्या विरोधात निषेध मोर्चा आणि आक्रोश सभा यांचे आयोजन !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयाच्या साहाय्याने निकाल दिला जावा, पूनावाला कुटुंबियांचे भारतीय नागरिकत्व रहित व्हावे….

कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्‍यांचा विरोध !

पुणे येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सी.पी.आर्.चे प्रशिक्षण पार पडले !

अचानक येणार्‍या हृदयविकाराच्या झटक्यावरील प्राथमिक उपचार देण्यासाठी, म्हणजेच ‘सी.पी.आर्.’  देण्यासाठी त्याचे महत्त्व, ते देण्याची अचूक पद्धत, यासाठी आवश्यक गुण याविषयी भूलतज्ञ डॉ. ज्योती काळे यांनी मार्गदर्शन केले.

गायरान भूमीवरील घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून नियमित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गायरान भूमीवर असलेल्या भूमीहीन नागरिकांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करण्यात येतील. सरकारचा हा निर्णय सर्वाेच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयाला अधीन राहून घेण्यात आला आहे.