हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद

रत्नागिरी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी ३ डिसेंबर २०२२ या दिवशी मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. २९ नोव्हेंबर या दिवशी ‘हॉटेल व्यंकटेश एक्सिक्युटिव्ह’ येथे ही पत्रकार परिषद झाली.

डावीकडून सर्वश्री महेंद्र चाळके, गणेश गायकवाड, विनोद गादीकर, संजय जोशी आणि चंद्रकांत राऊळ

हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य ! – गणेश गायकवाड, अध्यक्ष, गोसेवा संघ, तसेच धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आज १०० कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदूंसाठी जगात एकही हिंदु राष्ट्र नाही. धर्माच्या आधारे फाळणी होऊन पाकिस्तान मुसलमानांचे राष्ट्र होत असेल, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; मात्र तसे न होता भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले. हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे.

या वेळी गोसेवा संघ ता.जि. रत्नागिरीचे उपाध्यक्ष आणि हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ म्हणाले की, अल्पसंख्यांकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी कोणता अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो.

हिंदु जनजागृती समिती आयोजित
🚩हिंदु राष्ट्र-जागृती सभा🚩

👆 क्लिक करावे 👆


आज होणार वाहनफेरी

या सभेच्या प्रचारासाठी ३० नोव्हेंबरच्या दुपारी ४ ते सायं. ६ या वेळेत वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत हिंदूंनी सहभागी व्हावे, तसेच ३ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सर्वश्री विनोद गादीकर, संजय जोशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश गायकवाड, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ आणि सनातन संस्थेचे साधक श्री. महेंद्र चाळके यांनी केले.


💥हिंदु राष्ट्र-जागृती सभेत होणार या वक्त्यांचे मार्गदर्शन !💥

🔥सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

🔥श्री. रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष

🔥श्री. मनोज खाडये हिंदु जनजागृती समिती

___________________