शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

दैनिक ‘सनातन प्रभात’ने ‘राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून जनजागृती केली होती. तसेच याविषयी कारवाई होण्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावाही केला होता.

मुंबई – मुंबईतील गडांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आणि पर्यटनविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

सौजन्य साम टीव्ही

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, बैठकीमध्ये मुंबईतील गडांवरील अनधिकृत बांधकामाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानुसार हे सर्व गड अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवडी गडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. या ठिकाणची अनधिकृत बांधकामे काढून हा गड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. गडांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !