हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदु परिषद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अधिकोषाकडे नोंदवली तक्रार !
मुंबई – काही दिवसांपूर्वी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या दादर (पूर्व) आणि गोवंडी येथील शाखांनी साप्ताहिक सुटीचा दिवस ‘रविवार’ऐवजी ‘शुक्रवार’ केल्याची घोषणा केली होती. १ डिसेंबरपासून यावर कार्यवाही होणार असल्याचेही अधिकोषांकडून घोषित करण्यात आले. सर्वधर्मसमभाव जपणार्या भारतामध्ये ठराविक धर्मियांना झुकते माप देण्याच्या या निर्णयाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विचारणा केली असता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या दोन्ही शाखांकडून हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विश्व हिंदु परिषदेकडूनही सुटीचा दिवस पालटल्याविषयी अधिकोषाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती.
१. अधिकोषाने सुटीचा दिवसा रविवारऐवजी शुक्रवार करण्याच्या निर्णयाविषयी हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी दादर (पूर्व) शाखेचे मुख्य प्रबंधक अभयकुमार, तर ३० नोव्हेंबर या दिवशी गोवंडी शाखेचे सेवा प्रबंधक आदेश पिल्लेवान यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
In view of the public sentiment and their convenience, we have decided to maintain the status quo in respect of ‘weekly off’ of the few branches including Govandi Branch. The ‘weekly off’ will continue to be on Sunday / Monday, as usual.
— CGM (Mumbai Metro Circle), SBI (@CGMSBIMum) November 30, 2022
२. या वेळी मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, वारकरी संप्रदायाचे श्री. अशोक सोनावणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार, धर्मप्रेमी श्री. घनश्याम खटखटे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दादर (पूर्व) शाखेचे मुख्य प्रबंधक अभयकुमार यांची भेट घेतली.
३. अनेक खातेदारकांकडूनही सुटीचा दिवस पालटल्याविषयी अधिकोषामध्ये विचारणा करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी सुटी देण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या दोन्ही शाखांकडून सांगण्यात आले.
संपादकीय भूमिका
|