राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांच्या अन्वेषणासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले उद्योग कोणत्या कारणांमुळे गेले याचे अन्वेषण करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

अक्कलकोटमधील २८ गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक ?

अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूल सुविधा मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या या गावांमधील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले

रत्नागिरी येथे वाहनफेरीच्या माध्यमातून भगवा झंझावात !

हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी ३ डिसेंबर २०२२ या दिवशी मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसारासाठी आज शहरातून वाहनफेरी काढण्यात आली, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

जिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला !

पावसाळ्यात पुलावरील काढलेले कठडे परत न लावल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे या मार्गाचे दायित्व आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

बीड जिल्ह्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवून चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करत आहेत.

राज्यात ३ डिसेंबरपासून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग कार्यरत होणार !

सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘संत परंपरा जाती निर्मूलनासाठी कार्य करत नाही !’ – शिवाजी राऊत, पुरोगामी विचारवंत

शिवाजी राऊत हेच एका भाषेविषयी द्वेष प्रकट करून समाजामध्ये भाषिक आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे १९ वर्षांतील सेवेतील १७ वे स्थानांतर !

अद्याप कोणत्या विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली, हे सरकारकडून घोषित करण्यात आलेले नाही. वर्ष २००५ मध्ये सनदी अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची मागील १९ वर्षांच्या सेवेतील हे १७ वे स्थानांतर !

तुर्भे येथील उद्यानाची दुरवस्था; रहिवाशांना उद्यानात जाण्यास बंदी  

येथील नागरिकांना या उद्यानात चालण्यास, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास अटकाव केला जात आहे. इतकेच नव्हे, तर लहान मुलांना खेळण्यासाठी आत जाऊन दिले जात नाही.

प्राणघातक आक्रमण प्रकरणात पसार झालेला दौंड (पुणे) महापालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला अटक !

दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्‍या महिला आणि तरुण यांवर प्राणघातक आक्रमण प्रकरणातील संशयित आरोपी तथा दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख अन् त्याचा सहकारी रमजान याला पोलिसांनी राजस्थान मधून २९ नोव्हेंबर या दिवशी कह्यात घेतले आहे.