‘सीरम’च्या लसीच्या वापराला अनुमती

‘सीरम इन्स्टिट्युट’च्या ‘कोविशिल्ड’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. याविषयीच्या तज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे लसीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

भारत जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार ! – पंतप्रधान मोदी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या न्यून होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याची सिद्धता करत आहोत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अ‍ॅमेझॉन’ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या पत्रानंतर ‘मुसलमान प्रेमींसह हिंदु पत्नीचे प्रेमप्रकरण’ हे पुस्तक हटवले !

केवळ एक पुस्तक काढून टाकणे अपेक्षित नाही, तर अशी अनेक पुस्तके ‘किंडल’वर असून ती सर्व काढून टाकण्यासह अ‍ॅमेझॉनने याविषयी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !

भारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा निघालेला नाही ! – संरक्षणमंत्री

चीनसमवेतच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनवर आक्रमण करून त्याला धडा शिकवणे, हाच एकमेव पर्याय आहे, हेही तितकेच खरे !

विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले.

भारताच्या अंतर्गत सूत्रांवर बोलणे बंद करा !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !

भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी  

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध पुस्तकांद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

अ‍ॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. हिंदूंनी विरोध केल्यावर अ‍ॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अ‍ॅमेझॉनची मूळ हिंदुद्वेषी वृत्ती पालटलेली नाही.

कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारावी !

जर मुसलमान आणि हिंदु या लसीद्वारे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवत आहेत, तर सरकारने या लसीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे, हे अधिकृतपणे घोषित करावे, असेच जनतेला वाटते ! – स्वामी चक्रपाणी, हिंदू महासभा

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात ६ जणांना संसर्ग

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाचे संक्रमण झालेले ६ रुग्ण भारतात आढळले आहेत.