‘किंडल’वर विक्रीस ठेवलेल्या मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांच्या अश्लील पुस्तकांच्या विरोधात तक्रारी
|
नवी देहली – ‘अॅमेझॉन’च्या ’किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रामध्ये मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांचे वर्णन असलेल्या अश्लील पुस्तकांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर आणि राष्ट्रीय महिला आयोगाने ‘अॅमेझॉन इंडिया’ला पत्र लिहिल्यानंतर यावरील ‘मुसलमान प्रेमींसह हिंदु पत्नीचे प्रेमप्रकरण’ हे पुस्तक काढण्यात आल्याचे दिसत आहे.
१. ‘किंडल’वर अश्लील साहित्य, तसेच बलात्काराच्या कल्पनांवर लिहिलेली ई-पुस्तके असल्याचा आरोप एका ट्विटर वापरकर्त्याने केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने अॅमेझॉन इंडियाला पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे या आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटर पोस्टची स्वत:च नोंद घेत हे पत्र लिहिले. त्यात अॅमेझॉनची ‘किंडल’ शाखा अश्लील आणि बलात्काराचे लिखाण विकत असल्याचे म्हटले आहे. तसेच यात मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांचे संबंधांचे अश्लील चित्रण आहे.
@NCWIndia has taken cognizance of the matter. Chairperson @sharmarekha has addressed a letter to @amazonIN to take all the measures to stop the transmission of any such content that may perpetrate and promote crime against women. https://t.co/VO0u5McfMN
— NCW (@NCWIndia) December 28, 2020
Taken up. https://t.co/pVCgJZ5fD6 pic.twitter.com/TGJZPETx6N
— Rekha Sharma (@sharmarekha) December 28, 2020
२. पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘अॅमेझॉन’चे ’किंडल’ हे पोर्न साहित्यावरील ई-पुस्तक केंद्र मुसलमान पुरुष हे हिंदु महिलांवर करत असलेल्या बलात्काराच्या कल्पनांनी भरलेले आहे. ‘हिंदु पत्नीचे मुसलमान प्रेमींशी प्रेमसंबंध’ यासारख्या शीर्षकासह असलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गोल टोपी घातलेला पुरुष आणि टिकली लावलेली महिला यांचे चित्र आहे. १२ हून अधिक लेखकांची पुस्तके अशा रीतीने विक्रीस ठेवली आहेत.
Amazon’s Kindle is full of e-books on porn literature & even rape fantasies featuring Muslim men & Hindu women. With titles like ‘Hindu wife’s affair with Muslim lover’, covers showing skull cap-wearing men & bindi-wearing women. Scores of books by dozens of authors.
Report soon pic.twitter.com/V5XTb7wLIS— Swati Goel Sharma (@swati_gs) December 28, 2020
प्रयागराज येथे तक्रार
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे अधिवक्ता अनय श्रीवास्तव यांनी ‘किंडल’च्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.