आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आसाम सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

उदलगुरी (आसाम) – एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दरंग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या २ गावांमधून अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली. यात आबेदा खातून ही महिला आहे. मुख्य आरोपी अब्दुल बरेक याने या तरुणीचे अपहरण केले आणि तिला दालगाव येथे नेले. धर्मांध आरोपींनी पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने असे करण्यास नकार दिला तेव्हा अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार आणि बादशाह अली या चौघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला ठार मारले. नंतर तिचा मृतदेह एका शेतात फेकला. या गुन्ह्यात साहाय्य केल्यावरून आबेदा खातून हिलाही अटक करण्यात आली.