आसाममध्ये नरसिंह मंदिरात चोरी !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

नरसिंह मंदिर (सौजन्य: सोशल मिडिया)

करीमगंज (आसाम) – येथील बलिया गावामध्ये १० एप्रिल या दिवशी नरसिंह मंदिरातील पुजार्‍याच्या कुटुंबियांना मारहाण करून मंदिरातील सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले. बलिया गाव बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे.