आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

देवभाषा संस्कृतमधून शपथ घेणार्‍या आमदारांचे अभिनंदन ! त्यांच्याकडून देशातील नवनिर्वाचित अन्य आमदारांनी आदर्श घेऊन असा प्रयत्न केला पाहिजे !

(डावीकडे) अमियकुमार भुइया, (मध्यभागी) जयंत मल्ला बरुआ, (उजवीकडे) सुमन हिप्रिया

गौहत्ती (आसाम) – विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात  सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा समावेश आहे.