रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकावलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

रांगिया (आसाम) – राज्यात विधानसभा निवडणुका चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकावला. यावरून येथे आरोप-प्रत्यारोप चालू झाले. विरोधकांनी याला भाजपच उत्तरदायी असल्याचा आरोप केला. भाजप राज्यात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला; मात्र हा झेंडा नेमका कुणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा झेंडा नंतर स्थनिक लोकांनी आग लावून जाळला. तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.