१. सकाळी ५ वाजता पत्नीने उठवल्यावर घरात चोरी झाल्याचे समजणे आणि तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न येता स्थिर रहाता येणे
‘२५.८.२०२३ या दिवशी पहाटे ३ वाजता माझ्या घरात चोरी झाली. भ्रमणभाष, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन), पॅनकार्ड, ‘ए.टी.एम्.’ कार्ड अशा महत्त्वाच्या वस्तूंची चोरी झाली. माझ्या पत्नीने सकाळी ५ वाजता मला उठवल्यावर ‘आपल्या वस्तूंची चोरी झाली आहे’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मी मनाने अगदी स्थिर होतो. श्री गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना केली. मला राग आला नाही.
२. रक्षाकवच यंत्र चोरीला जाणे आणि ‘ते कसे मिळेल ?’, हे देवाला शरण जाऊन विचारणे मला दिलेले रक्षाकवच यंत्र सुद्धा चोरीला गेले होते. ‘ते मला कसे मिळेल ?’, हे मी देवाला शरण जाऊन विचारू लागलो.
३. श्री गुरुदेवांचे स्मरण केल्यामुळे चोरीला गेलेली सर्व कागदपत्रे आणि रक्षाकवच यंत्र मिळणे
एका व्यक्तीला माझ्या घरापासून एक कि.मी. अंतरावर ती सर्व कागदपत्रे सापडली. त्या व्यक्तीने माझा शोध घेऊन ५ दिवसांनंतर सर्व कागदपत्रे माझ्या बहिणीला दिली. श्री गुरुदेवांचे स्मरण केल्यामुळे त्यांच्या कृपेने मला सर्व परत मिळाले. रक्षाकवच यंत्रसुद्धा मिळाले. श्री गुरुदेवांमुळेच मला स्थिर आणि आनंदात रहाता येत आहे. गुरुमाऊली तुमच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. भिकन मराठे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे), जळगाव (४.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |