पनवेल – नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अमली पदार्थ तस्करीतील एका आरोपीला पोलीस धाड कधी घालणार आहेत ? याची माहिती दिल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधित शिपायाला निलंबित केले आहे. १७ एप्रिल या दिवशी रात्री हे आदेश पोलीस आयुक्तांनी घोषित केले. निलंबनाची कारवाई झालेल्या या पोलीस शिपायाचे नाव मुजीप नूरमहंमद सय्यद असे आहे. सय्यद हा रबाळे एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात काम करत होता.
४ डिसेंबर २०२३ या दिवशी अमली पदार्थ विकणार्यांची धरपकड संपूर्ण नवी मुंबईत चालू होती. त्या वेळी पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून अमलीपदार्थ विक्रेते, तस्कर आणि अमली पदार्थाचे सेवन करणार्यांना कह्यात घेतले. एका प्रकरणातील संशयित आरोपी दीपक कारंडेकर याच्याकडे मोठ्या प्रमाणात एम्.डी. हा अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचला होता. पोलीस धाड घालून दीपकला पकडणार आहेत, याची माहिती कारंडेकर याला सय्यद याने दिली. त्यामुळे तो सतर्क झाला. त्याने त्याच्याजवळील अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्याऐवजी अल्प प्रमाणात एम्.डी. हा अमली पदार्थ स्वतःकडे ठेवला.
यापूर्वीही नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हेगारांना साहाय्य करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.
संपादकीय भूमिका :
|