सनातन संस्थेच्या व्यापक अध्यात्मप्रसाराच्या (धर्मप्रसाराच्या) कार्यात योगदान देऊन धर्मसेवा करा !

सनातन संस्था जीवन आनंदी बनवण्यासाठी आणि शीघ्र आध्यत्मिक उन्नतीसाठी वैयक्तिक (व्यष्टी) साधना करण्यासह समष्टी साधनेचीही शिकवण देते. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न ! यासाठी सनातन संस्था अध्यात्मप्रसारक विविध उपक्रम आयोजित करते.

१. कुठल्याही योगमार्गानुसार साधना करणार्‍या साधकाला शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ‘साधना सत्संग’ आयोजित केले जातात. यात सहभागी व्हा आणि साधक बना !

२. सनातन संस्थेची ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयांवरील प्रवचने आपला परिसर, जवळचे मंदिर, तसेच कार्यालय आदी ठिकाणी आयोजित करा !

३. अध्यात्म, साधना, धर्माचरण, हिंदु धर्म आदी विषय  वैज्ञानिक परिभाषेत शिकवणारे सनातनचे ग्रंथ मंगलप्रसंगी, तसेच सण-उत्सवांच्या वेळी भेट द्या !

४. भावी पिढी सुसंस्कारित आणि राष्ट्रभक्त होण्यासाठी सनातनचा बालसंस्कारवर्ग आपल्या परिसरात आयोजित करा अन् त्यात आपल्या मुलांना पाठवा.

५. कुटुंबातील युवकांना साधक बनण्यासाठी सनातनच्या युवा साधना सत्संग आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यशाळा यांचा लाभ घेण्यास प्रवृत्त करा !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !