उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात. व्यायाम तर नेहमीपेक्षाही न्यून करावा. मूलतः कोरडा आणि वात संचय करणारा ऋतू असल्याने वाताचे त्रास वाढू शकतात. वजन कमी करण्यासाठी तेल किंवा तूप वा साखर पूर्ण बंद करून केवळ कोरडा आहार, कच्च्या भाज्या घेणेही टाळावे. उपवास अथवा न्यून खाणे करून किंवा कुठल्याच पद्धतीत वजन न्यून करण्याचा प्रारंभ शक्यतो उन्हाळ्यात करू नये.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२४.४.२०२४)

(वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)