रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) मोहन बेडेकर यांच्या मृत्यूनंतर केलेले सूक्ष्म परीक्षण

(कै.) मोहन बेडेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी गेल्यावर जाणवलेली सूत्रे

१. ‘काकांच्या घरी गेल्यावर ‘तेथे कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे मला जाणवत नव्हते. त्या वेळी वातावरणात दाब जाणवत नव्हता, तसेच वातावरणात सकारात्मकता आणि हलकेपणा जाणवत होता.

२. घरातील ज्या शौचालयात बेडेकरकाका पडले, तेथेही मला हलकेपणा आणि चैतन्याचे वलय जाणवले.

३. ‘काकांची साधना चांगली असून त्यांना महर्लोकात स्थान मिळाले’, असे मला जाणवले.’

(‘प्रत्यक्षातही काकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’ – संकलक)

– सौ. कोमल किरण जोशी (१३.४.२०२३)

‘चैत्र कृष्ण द्वितीया (८.४.२०२३) या दिवशी रत्नागिरी येथील मोहन बेडेकर यांचे निधन झाले. आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने मोहन बेडेकर यांच्या मृत्यूनंतर अनुमाने २ घंट्यांनी साधिका सौ. कोमल किरण जोशी यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

(कै.) मोहन बेडेकर

१. मला जाणवले, ‘बेडेकरकाकांच्या मृत्यूसमयी त्यांचे गुरुस्मरण आणि ‘महाशून्य’, असा जप चालू होता. त्यामुळे त्यांच्या मनोदेहातील मायेचे विचार नष्ट झाले. त्यांचे त्यांच्या नातेवाइकांशी असलेले देवाण-घेवाणरूपी बंधन नष्ट होऊन त्यांच्या आनंदात वाढ झाली.’

सौ. कोमल जोशी

२. मला काकांचा लिंगदेह पुष्कळ आनंदात दिसला.

३. त्यांनी मला सूक्ष्मातून सांगितले, ‘मी (बेडेकरकाका) शौचालयात गेल्यावर माझ्या छातीत कळ आली. तेव्हा लगेच शरणागत होऊन मी प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण केले. नंतर माझा ‘महाशून्य’ हा नामजप चालू झाला. माझा प्राण सहजतेने बाहेर पडला.’

४. देवाने मला सांगितले, ‘सर्वसामान्य मनुष्याचा लिंगदेह स्थूलदेहातून बाहेर आल्यावर त्याला त्याविषयी लगेच लक्षात येत नाही.’ त्या वेळी मला जाणवले, ‘मृत्यूसमयी काकांना वेदना होत होत्या. त्यांचा त्याग, त्यांच्यामधील सेवाभाव आणि निरागसभाव’, यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होती. त्यामुळे त्यांचा प्राण गुरुदेवांना आळवत आणि गुरुस्मरण करत स्थूलदेह सोडून आनंदाने बाहेर आला.’

५. काकांच्या लिंगदेहाकडे पहातांना मलाही आनंद जाणवत होता.

६. मध्येच मला त्यांचा हसरा चेहरा दिसत होता.

७. काका नातेवाईक किंवा माया यांमध्ये अडकले नाहीत. ते मृत्यूला आनंदाने सामोरे गेले.

८. त्यांचा लिंगदेह स्थूलदेहातून बाहेर आल्यावर त्यांनी प्रथम सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले.

९. त्यांच्या लिंगदेहाभोवती आकाशी आणि भगव्या रंगांची वलये होती.

१०. ‘त्यांच्यातील निरागसता वाढल्याने त्यांच्या लिंगदेहाच्या भोवती गुरुतत्त्वाचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.

११. मला काकांच्या लिंगदेहाच्या समवेत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेव काकांना म्हणाले, ‘बेडेकर तुम्ही जिंकलात ! आता पुढे जायचे.’

– सौ. कोमल किरण जोशी ((कै.) बेडेकरकाकांच्या सुनेची आई, वय ५२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.४.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.