मिरज प्रांताधिकार्यांचे आदेश !
मिरज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज प्रांताधिकार्यांनी सांगली येथील १९ जणांना महापालिका क्षेत्रातून १० दिवसांसाठी हद्दपार केले आहे. (हद्दपार करणे म्हणजे दुसरीकडे गुन्हा करण्यास दिलेली अनुमती ! – संपादक) एकाहून अधिक गुन्हे नोंद असलेल्या १९ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी मिरज प्रांत अधिकार्यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव प्रविष्ट केला होता. त्यावर प्रांताधिकार्यांनी २८ एप्रिलपासून १० दिवसांसाठी १९ जणांच्या हद्दपारीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मिरज येथील महात्मा गांधी पोलीस चौक क्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आजाद सिकंदर पठाण यास मिरज प्रांताधिकार्यांनी ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश दिला आहे. पठाण याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने आक्रमण, जबरी चोरी, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.