US Bans Indian Companies : अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यावर घातली बंदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणी सैन्यासमवेत बेकायदेशीर व्यवसाय करणे आणि त्याला ड्रोन पुरवणे, या आरोपांवरून अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यास बंदी घातली आहे. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांची आस्थापने, लोक आणि व्यापारी नौका यांवरही बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांचा रशियाला इराणी ड्रोन गुप्तपणे पोचवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे.

हे ड्रोन युक्रेनविरुद्धच्या युद्धात वापरले जातात. ज्या भारतीय आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात जेन शिपिंग, पोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सी आर्ट शिप मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.