‘काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येणार्या ‘सद्गुरु आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या’, अशा आशयाची चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आली होती. सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्राकडे पहातांना मला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या थेट प्रक्षेपणाच्या समन्वयाची सेवा करतांना सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर भावजागृती होणे
३.१.२०२४ या दिवशी सोलापूर येथे आणि ३०.१.२०२४ या दिवशी हुपरी (जि. कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्या. मला त्या सभांच्या थेट प्रक्षेपणाचा समन्वय आणि ‘मॉनिटरींग’ (लक्ष ठेवण्याची) च्या सेवा मिळाल्या होत्या. ही तांत्रिक सेवा होती. त्या दिवशी मी घरूनच या सेवेचा समन्वय पहात होते. असे असूनही सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन चालू झाल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या अंगावर रोमांच येत होते आणि ‘सद्गुरु स्वातीताई माझ्यासमोरच बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. सद्गुरु स्वाती खाडये यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांची भेट झाल्यासारखे वाटणे
८.३.२०२४ या महाशिवरात्री होती. त्या दिवशी सद्गुरु स्वातीताई पुणे जिल्ह्यात होत्या. महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुण्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावले होते. मी ‘सिंहगड रस्ता’ येथील ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करत होते. सकाळपासून सद्गुरु स्वातीताई आणि पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत) ग्रंथप्रदर्शन कक्षांना भेटी देत होत्या. तेव्हा ‘आज सद्गुरु स्वातीताईंची भेट होईल’, या विचाराने मला कृतज्ञता वाटत होती; पण रात्री अन्य सेवा असल्याने मी घरी गेले. मी घरी गेल्यावर सद्गुरु स्वातीताई आणि पू. मनीषाताई यांनी ग्रंथप्रदर्शन कक्षाला भेट दिली. माझी त्यांच्याशी भेट न झाल्यामुळे मला वाईट वाटले. त्यानंतर काही क्षणांतच मला एका सेवेसाठी सद्गुरु स्वातीताई आणि पू. मनीषाताई यांचे ग्रंथप्रदर्शन कक्षावरील छायाचित्र मिळाले. ते छायाचित्र पहातांना मला त्यांची भेट झाल्यासारखेच वाटले.
३. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना ‘प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत आहे’, अशी अनुभूती येऊन सेवाही लगेचच पूर्ण होणे
दुसर्या दिवशी याच सेवेविषयी मला सद्गुरु स्वातीताईंचा भ्रमणभाष आला. त्यांच्याशी बोलतांना मला प्रत्यक्ष त्यांना भेटल्याचा आनंद झाला. त्यानंतर सेवाही अधिक भावपूर्ण आणि अल्प वेळेत पूर्ण झाली.
४. ‘सद्गुरु स्वातीताईंनी एखादी सेवा सांगितल्यावर त्यांच्याच संकल्पाने ती लगेच पूर्णही होते’, याचीही मला अनुभूती आली.
५. सद्गुरु स्वाती खाडये यांचे छायाचित्र पहातांना आलेल्या अनुभूती
५ अ. प्रभु श्रीराम आणि सद्गुरु स्वाती खाडये यांचे विराट रूपात दर्शन होणे : २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी सद्गुरु स्वातीताई विदर्भातील चंद्रपूर येथे होत्या. त्या दिवशी त्यांनी चंद्रपूर येथील एका श्रीराममंदिरात जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले. सद्गुरु स्वातीताई प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत असतांनाचे छायाचित्र पहातांना मला ‘प्रभु श्रीराम आणि सद्गुरु स्वातीताई यांचे रूप विराट होत आहे’, असे दिसले.
५ आ. देवीस्वरूप जाणवणे : ‘त्यांचे छायाचित्र पहातांना साक्षात् देवीच विविध स्वरूपात आम्हाला दर्शन देत आहे’, असे मला जाणवते.
५ इ. प्रीती जाणवणे : त्यांचे स्मितहास्य असलेले छायाचित्र पहातांना त्यातील प्रीतीमय स्पंदने जाणवून भावजागृती होते.
५ ई. क्षात्रतेज जाणवणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.
६. सद्गुरु स्वाती खाडये यांचे छायाचित्र पाहून होणारे लाभ !
सद्गुरु स्वातीताई विविध जिल्ह्यांमध्ये धर्मप्रचारासाठी जातात. ‘त्यांना प्रत्यक्ष न भेटता केवळ त्यांचे छायाचित्र, ध्वनीचित्रफीत पाहून किंवा त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलल्यावरही मला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होऊन माझ्याकडून भावाचे प्रयत्न होऊ लागतात’, असे मला जाणवते.
प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. स्नेहल पाटील, पुणे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २६ वर्षे)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |