पाठ किंवा कंबर आखडणे यांमागील आणखी एक कारण !

प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्‍याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.

सध्या वाढत असलेले पचनाचे त्रास, तसेच घसादुखी, ताप आणि सर्दी या आजारांविषयी पाळावयाचे नियम !

पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत.

पोट साफ न होण्यामुळे उद्भवणारी स्थिती आणि त्यावरील उपाय !

‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.

आरोग्यम् धनसंपदा ।

‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आयुर्वेद : मानवी जीवनाचे शास्त्र

सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ सोडून आणि सर्व विषयांबद्दलची आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने समाजकार्य किंवा भगवद्भक्ती करावी.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

पूर्वापार चालत येणार्‍या आपल्या संस्कृती अनेक जण विसरतात; पण त्यामागे काही कारणे असतात. डोळ्यांत काजळ घालणे (अंजन) ही त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कृती.

आयुर्वेदाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार !

आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले       

वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष !

लहान मुलांना दूध प्यायला द्यावे कि नाही ?

आजकाल कित्येक बालरोगतज्ञ लहान मुलांना ‘दूध पिऊन बद्धकोष्ठ होतो’, असे सांगून दूध बंद करायला लावतात, असे दिसते. दूध हे सारक, म्हणजे शौचाला साफ करवणारे असते. या विरोधाभासाची सांगड कशी घालायची ?