पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उमेदवारांची अर्ज प्रक्रिया चालू होण्यापूर्वी ५२ तक्रारी आणि त्यानंतरच्या ८ दिवसांमध्ये १६ तक्रारींची वाढ झालेली आहे. त्यातील १३ तक्रारींवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तर ५५ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक १८ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघातून ६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजील’ ही भ्रमणभाष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यावर तक्रारी करणे सहज सुलभ होत आहे.