सद्गुण

वैद्या स्वराली शेंड्ये

आयुर्वेदात एक छान सूत्र आहे, ते म्हणजे एखाद्या यशामागील कारण समजून ते आपल्या कार्यवाहीत आणता येते का ? याचा विचार करावा. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली, तर त्या गोष्टीवरून ईर्ष्या करू नये. एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते. एखादी व्यक्ती एखाद्या स्थानावर पोचल्यावर ‘तिच्यासाठी तर हे किती सोपे होतेच की’, हे बोलण्याआधी १० वेळा विचार करावा; कारण आपल्याला त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि पूर्ण परिस्थिती ठाऊक नसते. उलट त्या व्यक्तीमध्ये असणारे कोणते गुण आपण घेऊ शकतो, याकडे लक्ष ठेवून आपण आपल्या मार्गाने चालणे श्रेयस्कर ! त्याच्या यश-अपयशाची चर्चा करण्यापेक्षा आपल्याला काही वैयक्तिक लाभ नाही, हे लक्षात आले तरी पुरे !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, पुणे.