महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी

भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

‘प्रँक व्हिडिओ’च्या विरोधात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाने खरेतर स्वत:हून या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. नेहमी कुणा संघटनांनीच असे अपप्रकार समोर आणल्यावर प्रशासनास जाग येणे, लज्जास्पद !

मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रीशक्तीचे योगदान महत्त्वाचे ! – सौ. स्वाती यादव, शिवसेना

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने करवीर महिला शिवसेना आघाडीच्या वतीने आशासेविकांच्या सत्कार सोहळ्यात सौ. स्वाती यादव बोलत होत्या.

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवरून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित

जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली.

विवाहितेचा सासरी झालेल्या छळाला पतीच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली.

भारतीय महिलांच्या विवाहबाह्य संबंधांची खोटी आकडेवारी घोषित करणार्‍या ‘अ‍ॅप’वर बंदी घाला !

भारतीय महिलांची अपकीर्ती करणार्‍या फ्रान्समधील ‘फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप’वर बंदी घालावी, अशी मागणी जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.

८ मार्चच्या जागतिक महिलादिनी दोन महिलांनी ५१० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले खेड्यामधील दारूचे दुकान !

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्‍या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमा !

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे.

अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणार्‍या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. प्रांजली पाटील (राजपूत) !

गेल्या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यू.पी.एस्.सी’च्या) परीक्षेत पहिल्या दृष्टीहीन विद्यार्थिनी सौ. प्रांजली लहेनसिंग पाटील या उत्तीर्ण झाल्या. अंध विद्यार्थिनींमधून पात्र ठरणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. याचा सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी योग्य वयात उपयोग करून घ्यावा. त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते.