
कोल्हापूर – स्वराज्य निर्मितीची शक्ती राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराराणी यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केली असून मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रीशक्तीचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव यांनी केले. ८ मार्च या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने करवीर महिला शिवसेना आघाडीच्या वतीने आशासेविकांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गांधीनगर शासकीय वसाहत रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. विद्या पॉल होत्या.
या वेळी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अर्चना करी, उंचगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री रेडकर, स्वाती जाधव, श्रीमती मीना पवार, सौ. छाया घोरपडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गावप्रमुख दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विनायक जाधव, युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले यांच्यासह आशासेविका उपस्थित होत्या.
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध