‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे

‘तांडव’ वेब सिरीजच्या दिग्दर्शकाच्या विरोधात अखेर मुंबईत गुन्हा नोंद

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते, ओरिजिनल कन्टेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, गौरव सोलंकी, झिशान आणि अन्य कलाकार यांच्यावर अखेर गुन्हा नोंद !

खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात ११ जणांवर कोरोनाच्या लसीचे किरकोळ दुष्परिणाम

‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.

धनंजय मुंडें यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केली.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. मुंडे यांना ५ अपत्ये असल्याची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे.

तांडव’च्या निर्मात्यांविरोधात राम कदम यांची पोलिसात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींचे निकाल लागण्यास आरंभ

१६ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला आरंभ झाला आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा येथील काही निकाल आता समोर येत आहेत.

सरस्वतीदेवीचा अपमान केल्याप्रकरणी यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र करणी सेनेकडून पोलिसात तक्रार

सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यास विरोध केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची, तसेच बौद्ध आणि हिंदु धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करून कवि यशवंत मनोहर यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे.