धनंजय मुंडे आणि त्या महिलेचा वाद मध्यस्थांच्या वतीने मिटवण्यात येणार

मुंडे आणि महिला यांच्या वतीने न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यासमोर परस्पर सहमतीची सूत्रे सादर करण्यात आली.

एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

देहलीत हिंसा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती असल्याने त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावरील सिंह यांची ही प्रतिक्रिया आहे.

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला !

येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे.

राज्यातील बर्ड फ्ल्यू हानीग्रस्तांना भरपाई देणार – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई दिली जाणार आहे.

शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !