‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

सोलापूर येथील धर्मप्रेमींची निवेदनाद्वारे मागणी

धर्मप्रेमींना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

निवेदन देतांना धर्मप्रेमी

सोलापूर – ‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. हे निवेदन महसूलचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वीकारले.

या वेळी सर्वश्री कृष्णहरी क्यातम, तुळसीदास चिंताकिंदी, बालराज दोंतुल, रमेश आवार, आनंद (भाऊ) मुसळे, विलास आडकी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.