दुसर्‍या टप्प्यांत पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे लसीकरण होणार

नवी देहली – देशात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांसमवेत कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. आता दुसर्‍या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार, तसेच आजार असणारे अन्य राजकीय नेते यांचे लसीकरण केले जाणार आहे. हा दुसरा टप्पा एप्रिल मासापासून प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.