मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाही !

भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

साहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू !- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

साहाय्यक प्राध्यापक भरतीविषयी सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

मलकापूर (कोल्हापूर) येथील महाविद्यालयात हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या शिक्षकांकडून क्षमायाचना !

अशा पुरो(अधो)गामी शिक्षकांचे कधी ख्रिस्ती किंवा इस्लाम पंथांमधील रूढी, परंपरा किंवा त्यांचे धर्मग्रंथ यांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

येत्या शैक्षणिक वर्षात ३० सहस्र शिक्षकांची भरती करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘प्रत्येक विषयासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीमुळे शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल’, असे केसरकर यांनी सांगितले. 

कर्नाटकात शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींकडून चोप !

असे वासनांध मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक ! अशांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची हुशारी पडताळण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत ६० सहस्र शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार !

जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता न पहाताच शिक्षकांची भरती केली जाण्याचा आरोप केला जातो. त्यामुळे शाळेत गुणवत्ता असलेल्या शिक्षकांची भरती अल्प होते. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आणि शिक्षणाचा दर्जा खालावतो.

धारणी (जिल्हा अमरावती) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित !

असे अनैतिक वर्तन करणारे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?

दिब्रुगड (आसाम) येथे विद्यार्थ्यांकडून ५ मासांच्या गर्भवती शिक्षिकेशी गैरवर्तणूक : २२ विद्यार्थी निलंबित  

जे विद्यार्थी एका शिक्षिकेशी असे वागत असतील त्यांची शाळेतून हकालपट्टी करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, तरच त्यांना अद्दल घडेल !