नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – शासनाकडून शिक्षक आणि शिक्षकेत्तर भरतीची प्रक्रिया चालू आहे. येत्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ३० सहस्र शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात दिली. ‘प्रत्येक विषयासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीमुळे शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल’, असेही या वेळी केसरकर यांनी सांगितले.